महिलांकडून ही बँक फक्त महिलांसाठीच सुरु करण्यात आली.

या सर्वाची सुरुवात झाली एका नकारापासून


ग्रामीण महाराष्ट्रातील म्हसवडमध्ये फुटपाथवर आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या व वेल्डींग काम करणाऱ्या कांताबाई आमच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना भेटल्यानंतर १९९७ मध्ये माण देशी महिला सहकारी बँक सुरु करण्यात आली. त्यांना एक खाते उघडण्याच्या प्रयत्नात अनेक बँकांकडून मिळालेल्या नकाराची अस्वस्थ करणारी कहाणी त्यांनी ऐकवली. पावसाळ्यात आपल्या घराचं संरक्षण करता यावं म्हणून ताडपत्री विकत घेण्याच्या दृष्टीने थोडे पैसे वाचवून ठेवण्यासाठी कांताबाईंना फक्त एक सुरक्षित जागा हवी होती. चेतना यांनी कांताबाईंसारख्या महिलांसाठी एक बँक सुरु करायचे ठरवले. १३३५ महिलांनी त्यांची बचत एकत्र केली (७.८ लाख) आणि ग्रामीण महिलांसाठी त्यांनीच चालवलेली भारतातील पहिली बँक सुरु केली. आजही ती सभासदांकडून चालवली जाणारी आणि सभासदांच्या मालकीची बँक आहे.

माणदेशीची आजची स्थिती

(आकडे ३१ मार्च २०१८ नुसार)

जमा रक्कम

९७ कोटी

खातेधारक

२००,०००+

शाखा

खेळते भांडवल

१११ कोटी +

सभासद

२६,००० +

कर्जे

५०० कोटी +

परतफेडीचा दर

९६%

ग्रामीण महिलांना आपले पैसे बचतीत ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून या बँकेची सुरुवात झाली असली तरी, काळानुसार आम्ही विस्तारत आणि विकसित होत गेलो आहोत. महिलांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवता यावे आणि त्यांचे उत्पन्न वाढवता यावे यासाठी मदत करण्यावर आमचा भर राहिला आहे. घरपोच बँकिंग सेवा, इलेक्ट्रॉनिक पासबुक, सूक्ष्म-उद्योगांसाठी कर्जे आणि विमा योजना पुरविणाऱ्या पहिल्या काही बँकांपैकी आम्ही एक होतो. आम्ही नियमितपणे महिलांना परवडणारी कर्ज उत्पादने बनवतो व प्रथमच बाजारात आणतो. महिलांचे व्यवसाय वाढावेत व संपन्न व्हावेत यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही माणदेशी फाउंडेशन सोबतही जवळून काम करतो. खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी बँकेकडे येणाऱ्या उद्योजकांना अतिरिक्त व्यावसायिक मदत व प्रशिक्षणासाठी फाउंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या व्यवसाय प्रशालेचा संदर्भ दिला जातो. त्याचप्रमाणे, व्यवसाय प्रशालांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना त्यांचे उद्योग उभे करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून कर्जे दिली जातात.

सध्या आम्ही महिलांना कॅशलेस बँकिंग समजून घेण्यास, त्याचा वापर करण्यास आणि त्यासोबत जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा महिला उद्योजकांना खात्रीशीरपणे मिळावा यासाठी आम्ही सोयीस्कर ठिकाणी प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष त्या-त्या वेळेत डिजिटल बँकींग सेवा पुरवण्यासाठी तयारी करत आहोत.

पुरस्कार

आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार

माणदेशीने जिंकला आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार

अल्प-उत्पन्न समूहांना बाजारपेठेवर आधारित धोरणांद्वारे सेवा पुरविणाऱ्या ३८ देशांतील १२८ अर्जदारांमध्ये माणदेशीला प्रथम क्रमांक मिळाला.

ग्लोबल इकॉनॉमिक समिट, २०१७

महिला उद्योजकतेला सहाय्य देण्यासाठी ‘नारी शक्ती’ पुरस्कार

ऑल इंडीया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (ए आय ए आय) आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर (डब्ल्यू टी सी) मुंबई यांच्या सहाव्या ग्लोबल इकॉनॉमिक समिट २०१७ मध्ये माणदेशीच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंडीयन बँक असोसिएशन

माणदेशी बँकेने जिंकला “बेस्ट इको-टेक अवॉर्ड”

इंडियन बँक असोसिएशनने 'बेस्ट इको-टेक' बँक पुरस्कारासह मान देश बँकेचे गौरव केले.

फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह बँक्स (महाराष्ट्र), २०१४

माणदेशीने जिंकले “बेस्ट वुमेन्स बँक अवॉर्ड”

वंचित गटातील महिलांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन वित्तपुरवठा केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती.सुरेखा मरांडी यांच्या हस्ते माणदेशीला पुरस्कार देण्यात आला.