ग्रामीण भारतातील महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला सहकारी बँक.

'महिलांचा आर्थिक विकास हाच माणदेशी महिला बँकेचा ध्यास.' आम्ही केवळ बँकिंग सुविधा पुरवत नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासु व स्वावलंबी बनण्यास मदत करून त्यांच्या सबलिकरणासाठी वाहून घेतलेला समूह बनवीत आहोत.

लाखो महिला सूक्ष्म उद्योजिकांना यशस्वीरित्या आपला व्यवसाय वाढविता यावा आणि आपल्या कुटुंबात व समाजात त्यांना मान मिळावा या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

माणदेशी च्या सहकार्याने मालमत्ता उभी करणे

माणदेशी च्या सहकार्याने मालमत्ता उभी करणे



आमचे सहकार्य

महिला उद्योजकांच्या गरजेनुसार तयार केलेली बँकींग उत्पादने व सेवा ग्रामीण महिलांना सहज उपलब्ध करुन देणे एवढेच आमचे उद्दीष्ट नसून, त्यांना संपन्नतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा देखील उद्देश आहे.

बँकिंग

महिलांच्या सूक्ष्मस्तरावरील व्यवसायांची आणि विशिष्ट परिस्थितींची आम्हाला मुलभूत पातळीवर जाणीव आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि त्यांच्या गरजांनुसार विशेष आखलेली उत्पादने पुरविण्यात आम्हाला मदत होते.

बँकिंगच्या पलीकडे

महिलांनी यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे व बाजारपेठेपर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात. या माध्यमातून आम्ही महिलांना कर्जे, खाती व भरणा रकमांच्या पलीकडे जाऊन मदत करतो.

घरपोच बँकिंग


लहान कर्जे उपलब्ध करुन देणे, हप्ते जमा करणे, तसेच बचत खात्यांमध्ये भरण्याच्या रकमा जमा करणे यांसाठी आम्ही आमच्या ग्राहकांना दररोज / आठवड्यातून एकदा जाऊन भेटतो.

तुमच्यासाठी आखलेली उत्पादने


ग्रामीण महिलांच्या रोख रकमेबाबतच्या विशिष्ट गरजांच्या मुलभूत समजांचा आधार घेऊन आम्ही आमची उत्पादने बनवून घेतो.

गोपनीयता


ग्राहकांच्या खात्यावरील माहितीची गोपनीयता राखली जाते, अशी माही संबंधित खातेदारांव्यातिरिक्त इतर कोणालाही दिली जात नाही.

ग्राहक हेच सभासद


आमच्या दृष्टीने, पैसे उपलब्ध करुन देणे पुरेसे नाही. आम्ही महिलांना त्यांच्या स्वतःच्या अर्थकारणावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो. आमचे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कार्यक्रम अगदी हेच लक्षात घेऊन आखण्यात आले आहेत; महिलांचे आर्थिक नियंत्रण आणि गोपनीयता वाढविणे.

तारणाशिवाय कर्जे


एखाद्या कर्जाची मागणी करताना महिलांकडे तारण असण्याची आवश्यकता नाही. त्या जामीनदार म्हणून इतर ४-५ महिलांसोबत एक गट बनवून एकत्रित कर्ज घेऊ शकतात.

ग्राहक सेवा


आमचे कर्मचारी हे आम्ही सेवा देत असलेल्या समूहामधूनच आलेले असतात. यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात व त्यांच्या प्रत्येक गरजेचे संपूर्ण समाधान करण्यास आम्हाला मदत होते.

कमी वाचाअधिक वाचा

महिलांनी महिलांसाठी बनविलेली
महिला बँक

माणदेशी महिला सहकारी बँक महिला उद्योजकांना वेळेवर, परवडण्यायोग्य आणि व्यवसाय अनुकूल क्रेडिट मिळवून देण्यास समर्पित आहे. आमची उत्पादने जे स्त्रियांच्या सूक्ष्म व्यवसाय आणि विशिष्ट परिस्थतींच्या आमच्या मूलभूत गरजा समजून घेतात.

खाते


बँकेत पैसे वाचवणे हे सुरक्षित आहे हे सुनिश्चित करते. केवळ ग्राहकच त्यांचे खाते प्रवेश करू शकतात.


अधिक वाचा

खाते

ठेवी


दीर्घ कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे उच्च व्याजदर मिळवतात.


अधिक वाचा

ठेवी

कर्जे


नियोजित कर्ज घेतल्याने ग्राहक त्यांचे व्यवसाय सुधारण्यास आणि उत्पन्नामध्ये वाढ करण्यास मदत करतात.


अधिक वाचा

कर्जे

विमा


विमा योजनेमुळे आमच्या उद्योजिकांचे, त्यांच्या कुटुंबांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होते.


विमा

पेंशन


निवृत्तीवेतन जमा केलेल्या निधीमधून नियमितपणे निवृत्तीचे समर्थन करते.


पेंशन

आमच्या सेवांमुळे बँकेचे व्यवहार सोपे होतात

एस.एम.एस. बँकींग सेवा


प्रत्येक व्यवहारासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यासोबत नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे सूचित करतो.

प्रत्यक्ष घरपोच बँकींग सेवा


आमच्या ग्राहकांना त्यांच्या दारात प्रत्यक्ष वेळेवर बँकिंग सेवा पुरवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींना अद्ययावत हॅन्डहेल्ड तंत्रज्ञानाने सक्षम करण्यात आले आहे.

ऑनलाईन पैसे हस्तांतरण


बँकेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहक इतर कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला एन.ई.एफ.टी. आणि आर.टी.जी.एस. द्वारे पैसे पाठवू शकतात.

कोणत्याही शाखेतून बँकींग व्यवहार


माणदेशी महिला सहकारी बँकेच्या आठ शाखांपैकी कोणत्याही शाखेतून ग्राहक आपले खाते वापरु शकतात व त्यावर त्वरित व्यवहार करु शकतात.

चेक क्लिअरिंग सेवा


चेक जलद गतीने क्लिअर होण्यासाठी आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेची चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) वापरतो.

सुरक्षित डिपॉझिट लॉकर


आमच्या सुरक्षित डिपॉझिट लॉकर सेवेद्वारे ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू बँकेमध्ये सुरक्षित आणि निश्चिंतपणे ठेऊ शकतात.

ए.टी.एम. मशिन्स


आमच्या म्हसवड आणि धायरी शाखांमध्ये प्रत्यक्ष ए.टी.एम. युनिट आहेत. लवकरच माणदेशी महिला सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये ती उपलब्ध होतील.

रु-पे डेबिट कार्ड


ग्राहकांना एक डेबिट कार्ड मिळते ज्यामुळे त्यांना ए.टी.एम.मधून पैसे काढता येतात आणि ई-कॉमर्स व्यापाऱ्यांकडे पेमेंट करता येतात.

आधार पेमेंट सेवा


फक्त समोरच्या व्यक्तीचा आधार क्रमांक सांगून ग्राहक आपल्या खात्यातून त्यांना पैसे पाठवू शकतात.

मोबाईल बँकींग


ग्राहकांना लवकरच आमचे कलेक्शन प्रतिनिधी वापरत असलेले मोबाईल ऍप वापरायला मिळेल, ज्यातून त्यांना आपली खाती, ठेवी, आणि कर्जे यांचे व्यवस्थापन करता येईल.

अधिक वाचा

ग्रामीण महिलांसाठी व्यावसायिक प्रशाला


आपला व्यवसाय उभा करण्यासाठी व वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील अशी व्यावहारिक व तांत्रिक उद्योजकीय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महिलांना आर्थिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या २० व्यावसायिक प्रशाला माणदेशी फाउंडेशनमार्फत चालवल्या जातात.

डिजिटल साक्षरता बस


रोख-विरहीत व्यवहारांचा फायदा कसा करुन घ्यायचा व आपले आर्थिक नियंत्रण आणि गोपनीयता कशी वाढवायची हे महिलांना शिकविण्यासाठी आमची डिजिटल साक्षरता बस स्थानिक ग्रामीण साप्ताहिक बाजारांना भेट देते.

समूहासाठी कार्यक्रम


आमच्या ग्रामीण महिला सूक्ष्म उद्योजकांना त्यांची उद्दीष्टे साध्य करण्यात कशी मदत करावी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही दर महिन्याला ग्रामीण बाजारात आणि आमच्या कार्यालयांत समूह बैठकांचे आयोजन करतो.

अधिक समावेशक बँकींगसाठी पाठपुरावा


महिलांसाठी आणखी समावेशक वित्तपुरवठ्यासाठी आम्ही नियमितपणे पाठपुरावा करीत असतो. आर्थिक वर्तुळात व आर.बी.आय. सोबत नियमितपणे संपर्कात राहून आम्ही घेतलेले धडे व अनुभव त्यांना कळवतो, तसेच अधिक उपयोगी धोरणे आणि उत्पादने सुचवतो. शून्य शिल्लक खात्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच तारणाशिवाय कर्जांवरील मर्यादा वाढवणे अशा कित्येक यशस्वी प्रयत्नांमध्ये आम्ही आघाडीवर राहिलेलो आहोत.

कमी वाचाअधिक वाचा

महिला उद्योजकांना बँकींगच्या पलीकडे जाऊन मदत करण्यासाठी माणदेशी फाउंडेशन माणदेशी महिला सहकारी बँक सोबत काम करते.


वेबसाईटला भेट द्या

परिवर्तनाच्या कथा

आमच्या ग्राहकांच्या कथा वाचा

बातम्यां मधे

सर्व पहा

आम्हास भेट द्या

आम्ही म्हसवड, सातारा, पुणे, गोंदवले, वदुज, दहिवडी, लोणंद आणि नवी मुंबई येथे शाखा आहेत, येथील कोणत्याही शाखेत भेट द्या.


कार्यालयीन वेळ:
सोमवार ते शुक्रवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६



आमच्या सर्व शाखा पहा