स्वयंपरिपूर्णता व आर्थिक सुरक्षेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाची आम्ही जडणघडण करीत आहोत.

आमच्या ग्राहकांना त्यांची आर्थिक सुरक्षा, नियंत्रण आणि संपत्ती निर्माण करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने आमच्या उत्पादनांची विशेष आखणी करण्यात आली आहे.

वित्तपुरवठा उपलब्ध करणे हा एकच घटक यशासाठी महत्त्वाचा आहे असे नाही. खऱ्या संधी उपलब्ध होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

महिलांना त्यांच्या आयुष्यावर अधिक नियंत्रण मिळवून देण्यासाठी माणदेशी फाउंडेशनकडून त्यांना व्यवसाय व अर्थकारणाविषयी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मदत पुरविली जाते.

आम्ही सतत नवकल्पना करत आहोत


विमुद्रीकरणाच्या कठीण प्रसंगी अभिनव उपाययोजना

नोव्हेंबर २०१७ मध्ये, जेव्हा विमुद्रीकरणाची घोषणा झाली, तेव्हा हे स्पष्ट होते की ₹ २,००० किंमतीच्या नोटा आमच्या हजारो ग्राहकांना उपयोगी पडणार नव्हत्या, कारण हे साप्ताहिक बाजारांमध्ये काम करुन फारच छोट्या रकमांचे व्यवहार करणारे सूक्ष्म उद्योजक होते. अनेक सरकारी बँकांकडे मोठ्या प्रमाणावर चलनी नाण्यांचा साठा पडून असतो. आम्ही स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या स्थानिक शाखेला संपर्क केला आणि त्यांच्याकडील सुट्टे पैसे घेऊन टाकले. आमच्या स्थानिक गटांनी मग जादा वेळ काम करून ₹ ५०० किंमतीची पाकीटे बनवली आणि वितरित केली, तसेच आमची ‘बिझनेस स्कूल ऑन व्हील्स’ बस एका ‘बँक ऑन अ बस’ मध्ये रुपांतरित केली. सहा साप्ताहिक बाजारांमधील सुमारे ५००० लोकांना या उपक्रमाचा फायदा झाला.

अशा प्रकारची पहिलीच कॅश क्रेडिट सुविधा

ग्रामीण आठवडा बाजार पेठेमधील अशा प्रकारची पहिलीच घरपोच रोख व्यवहार सुविधा असून, हा एक वेगळाच सूक्ष्म-उद्योग कर्ज प्रकार आहे. डझनभर गावांतील साप्ताहिक बाजारांमधून हजारो महिला विक्रेत्यांना त्यांचे खेळते भांडवल उभे करण्यासाठी सध्या या रोख व्यवहार सुविधेचा फायदा होत आहे. देशभरात असे ३०,००० साप्ताहिक बाजार आहेत ज्यावरुन या उत्पादनाची व्याप्ती वाढवण्यास प्रचंड संधी असल्याचे लक्षात येते.

मायक्रो फायनान्सच्या पलीकडे

आमचे उन्नती कर्ज जास्त अनुभवी महिला उद्योजकांसाठी आहे ज्यांना आपल्या व्यवसायात लक्षणीय वाढ करण्याची इच्छा आहे. लहान मायक्रो फायनान्सच्या अनेक कर्जांची यशस्वी परतफेड केल्यानंतर त्या आता ₹ ४०,००० ते ₹ ५ लाखांपर्यंतच्या पतमर्यादेसाठी तयार आहेत. ही एक सुरक्षित कर्ज योजना आहे.