सेवा

आमच्या सेवा बँकिंग सोपे करते

एस.एम.एस. बँकींग सेवा


प्रत्येक व्यवहारासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यासोबत नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे सूचित करतो.

प्रत्यक्ष घरपोच बँकींग सेवा


आमच्या ग्राहकांना त्यांच्या दारात प्रत्यक्ष वेळेवर बँकिंग सेवा पुरवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींना अद्ययावत हॅन्डहेल्ड तंत्रज्ञानाने सक्षम करण्यात आले आहे.

ऑनलाईन पैसे हस्तांतरण


बँकेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहक इतर कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला एन.ई.एफ.टी. आणि आर.टी.जी.एस. द्वारे पैसे पाठवू शकतात.

कोणत्याही शाखेतून बँकींग व्यवहार


माणदेशीच्या आठ शाखांपैकी कोणत्याही शाखेतून ग्राहक आपले खाते वापरु शकतात व त्यावर त्वरित व्यवहार करु शकतात.

चेक क्लिअरिंग सेवा


चेक जलद गतीने क्लिअर होण्यासाठी आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेची चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) वापरतो.

सुरक्षित डिपॉझिट लॉकर


आमच्या सुरक्षित डिपॉझिट लॉकर सेवेद्वारे ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू बँकेमध्ये सुरक्षित आणि निश्चिंतपणे ठेऊ शकतात.

ए.टी.एम. मशिन्स


आमच्या म्हसवड आणि धायरी शाखांमध्ये प्रत्यक्ष ए.टी.एम. युनिट आहेत. लवकरच माणदेशी बँकेच्या सर्व शाखांमध्ये ती उपलब्ध होतील.

रु-पे डेबिट कार्ड


ग्राहकांना एक डेबिट कार्ड मिळते ज्यामुळे त्यांना ए.टी.एम.मधून पैसे काढता येतात आणि ई-कॉमर्स व्यापाऱ्यांकडे पेमेंट करता येतात.

आधार पेमेंट सेवा


फक्त समोरच्या व्यक्तीचा आधार क्रमांक सांगून ग्राहक आपल्या खात्यातून त्यांना पैसे पाठवू शकतात.

मोबाईल बँकींग


ग्राहकांना लवकरच आमचे कलेक्शन प्रतिनिधी वापरत असलेले मोबाईल ऍप वापरायला मिळेल, ज्यातून त्यांना आपली खाती, ठेवी, आणि कर्जे यांचे व्यवस्थापन करता येईल.